fbpx

फोटोग्राफर बांधवांचा “सोहळा मैत्रीचा” कार्यक्रम उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । समाजातील विविध प्रसंगाची फोटोग्राफी करत असतांना त्या क्षणांची आठवण चिरकाल स्मरणात राहावी यासाठी सतत धावपळ करणारं व्यक्तिमत्व म्हणजे फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर.दुसर्‍यांचे आनंदाचे क्षण टिपणार्‍या या फोटोग्राफर व्हिडीओग्राफर बांधवांच्या मैत्री सोहळ्याचे आयोजन मुक्ताईनगर तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या भवानी माता मंदिर परिसरात करण्यात आले होते.

छायाचित्रकारांचा सोहळा मैत्रीचा क्षण आठवणींचा या ब्रिद वाक्याखाली संपुर्ण महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील २००० पेक्षा जास्त फोटो इंडस्ट्रीमधे विविध क्षेत्रात काम करणारांनी या मैत्री सोहळ्याला आपली हजेरी लावली. कोणतेही वैयक्तिक निमंत्रण नसतांना केवल सोशल मिडियाच्या माध्यमातुन आवाहान केले गेले आणि महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्हातील प्रतिनिधी या मैत्री सोहळ्याला उपस्थित होते.मैत्री सोहळ्याच्या निमीत्याने झालेल्या कार्यक्रमात फोटोग्राफीच्या क्षेत्रातील विविध मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती.

mi advt

यामधे आर. एम. सुर्वे, सुनिल बोर्डे,मिलींद देशमुख,अभय सावंत,नितीन मेश्रामकर, के गणेश,उदय देसाई,सचिन भोर, छोटु भारव्दाज,श्रीकृष्ण खेकाळे,विनोद देशपांडे,मनिष जगताप,सुनिल जाधव,रोशन ठाकुर,अनुप अहिर,राहुल खताळ,दिपक कुंभार, संजय जगताप, अनंत वाघ, रामभाले, समरेश अग्रवाल,केतन नंदनवार,कैलास जोरवर सुशील भोसले, नरेंद्र नायसे,किशोर गायकवाड, फुलचंद मेश्राम, नितीन रायपुरे, संजय वाडेकर इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

मान्यवरांनी कॅमेरा पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मैत्री सोहळा आयोजना मागची भुमिका विनोद चौधरी यांनी प्रास्ताविकातुन मांडली.याप्रसंगी बोलतांना सचिन भोर म्हणाले की एव्हडा सुंदर व देखण्या मैत्री सोहळ्या उपस्थित राहता आलं याचा आनंड शब्दात व्यक्त करण शक्य नाही.फोटोग्राफीचे क्षेत्राची व्याप्ती खुप मोठी असल्याने फोटोग्राफीच्या शिक्षणातुन सन्माना सोबतच समृध्दी मिळविण्याचा प्रयत्न फोटोग्राफर बांधवांनी करावा.

मित्रांसारख सुंदर या जगात काहीच नाही असे बोलतांना सचिन भोर यांनी आपल्या मनोगतात मांडले.मैत्रीची ताकद काय असते याचा अनुभव कोकणातील चिपळुन मधील पुर परिस्थिती आल्याचे उदय देसाई यांनी सांगीतले. पुरामुळे चिपळुन मधील २३ फोटोग्राफर बांधवांच्या फोटो स्टुडिओचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांना मदत करण्यासाठी केलेल्या आवाहानाला मित्रांनी केलेल्या मदतीतुन ५ लाखापेक्षा जास्त किमतीचे फोटोग्राफीचे साहित्याची मदत उभी करण्यात आली ही खरी मैत्रीची ताकद असल्याचे सांगीतले.सध्याच्या बदलत्या वातावरणात आपण सहकुटूंब सोबत बसुन फोटो अल्बम व व्हिडीओ बघु शकलो पाहिजे असे फोटोशुट करण्याची जबाबदारी फोटोग्राफरची असली पाहिजे.विविध प्रसंगाची फोटोग्राफी करत असतांना भारतीय संस्कृती व संस्कारांचे जतन करा असे भावनिक आवाहान रामकृष्ण सुर्वे यांनी याप्रसंगी बोलतांना केले. मिलींद देशमुख, के गणेश,संजय जगताप.रवी गोरे यांनी या कार्यक्रमप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

कांतीलाल गाढे यांनी मैत्री सोहळ्यानिमीत्त केलेली विशेष कविता सादर केली.मैत्री सोहळ्यात आपला फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळुन समाजातील दुर्बल घटकांना मदत करतात अश्या फोटोग्राफर बंधु भगिनींना सन्मानपत्र देउन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुनिल बोर्डे,संजय खर्चे.योगेश शर्मा, विवेक नारखेडे, शिवाजी पनसोडे,जयंत कोकाटे,संदीप भोपळे, अश्विन राजपुत,तुषार मानकर, रुपेश महाजन, निखील महाजन, प्रविण जामोदकर,केतन शर्मा, ज्ञानेश्वर सैदाणे,प्रशांत झोपे,मयुर भावसार,आनंद ठाकरे, बबलु वराडे,अशोक आबा,राजेंद्र शेळके,रामचंद्र कोळी, अमोल व राहुल पाटील,कृष्णा धरमाळे,सभापती किशोर गायकवाड, प्रमोद पाटील,श्रीमती कविता लालचंद पवार,सदाशिव महानुभाव, अभिनय नाईक,चंद्रकांत विटकरे, रामदास पाटील, अनिल पाटील, प्रविण पाटील, नरेंद्र पाटील,गणेश ऎनकर यांना सन्मानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. छायाचित्रकारांच्या मैत्री सोहळ्या च्या आयोजनासाठी संजय खर्चे, अभिनय नाईक, योगेश शर्मा,विवेक नारखेडे, मनोज पाटील,अनिल पाटील,संदीप धमोळे, रवी महाजन, डिगांबर बापु जाधव, सुनिल महाजन. किरण पाटील , विनोद चौधरी यांचेसह परिसरातील फोटोग्राफर बांधवानी पुढाकार घेतला होता.

या सोहळ्यादरम्यान काही छायाचित्रकारांना यावेळी चोपडा अपंग छायाचित्रकार रामचंद्र कोळी, बोदवड येथील छायाचित्रकार पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. निधनानंतर आपल्या पतीचा व्यवसाय श्रीमती कविता पवार यांनी पुढे चालू ठेवत आपल्या संसाराचा गाडा याच व्यवसायाच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केला तर त्यांना उत्कृष्ट महिला छायाचित्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज