⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सर्वसामान्यांना दिलासा : इंधन दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. जळगावात आज पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.  IOCL ने बुधवारी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यात सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जळगावात गेली आठवड्यापूर्वी पेट्रोल दर ११७ रुपयांवर गेला होता. मात्र केंद्राने दिवाळीच्या दिवशी इंधन दरावरील अबकारी शुल्क घटवण्याचा निर्णय घेत पेट्रोल ५ रुपयाने तर डिझेल १० रुपयाने स्वस्त केलं होत. त्यामुळे जळगावात पेट्रोल ११७ रुपयांवर १११ रुपयांवर आलं आहे. डिझेल देखील कमी झाले असून ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता
दरम्यान, निर्णयानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.