सणासुदीत इंधन दरांत विक्रमी वाढ ; वाचा जळगावातील पेट्रोल-डिझेलचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवा. तसेच 1 नोव्हेंबर, महिन्याचा पहिला दिवस. आजच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. आज देशात पेट्रोल 35 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे जळगावात आज एक लिटर पेट्रोलसाठी ११६.२९ रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलसाठी १०५.७० रुपये इतके आहे.

आधीच देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली गेली असतात त्यात सततच्या इंधन दरवाढीचा बोजा सहन करावा लागत आहे.  दरम्यान, महिनाभरात पेट्रोल ८ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेल जवळपास ९ रुपयांनी महागले असून पेट्रोल- डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होत आहे.

दररोज ६ वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

दरम्यान, मुंबईमध्येही पेट्रोलच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 115 रुपये मोजावे लागणार आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर सरकारनं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर मात्र लवकरच पेट्रोलचे दर 120 पार पोहोचतील. दरम्यान, कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या संघटना OPEC+ या आठवड्यात संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत उत्पादन वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. जर असं झालं तर किमतींमध्ये घट होऊ शकते. दरम्यान, भारतात गरजेच्या 80 टक्के कच्चं तेल परदेशातून खरेदी केलं जातं.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज