fbpx

पेट्रोल पाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर ; वाचा जळगावातील प्रति लिटरचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ ।  पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरु आहे. आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल भावात वाढ झाली आहे. आज शुक्रवारी पेट्रोलच्या दारात प्रति लिटर ३० पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावात पेट्रोलचा दर ११०.७३ रुपये प्रति लिटरवर आले आहे. तर डिझेलचा दर ९९.५३ रुपये प्रति लिटर इतके आहे. आता पेट्रोल पाठोपाठ डिझेल ही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे.

आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती सतत वाढत आहे.

जळगावमध्ये गेल्या ७ दिवसात पेट्रोल जवळपास दीड रुपयाने महागले आहे. १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल दर प्रति लिटर ९१ रुपयापर्यंत होते. ते आज ११० रुपयांवर गेले आहे. म्हणजेच गेल्या १० महिन्यात पेट्रोल दर जवळपास २० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात डिझेल दर जवळपास २ रुपयाने महागले आहे. २०२१ सुरवातीला डिझेल चा दर ८० रुपये होता. तो आता ९९ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात देखील गेल्या १० महिन्यात २० रुपया पर्यंतची वाढ झाली.

गेल्या महिन्यात (सप्टेंबर) एकवेळा ३८ पैशांनी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दिवसेंदिवस भाव वाढते असल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. बजेट कोलमडून महिन्याच्या खर्चात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे.

आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ९०४.५० रुपये इतकी झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज