fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

आजचा जळगावातील पेट्रोल-डीझेलचा भाव जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ ।आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असता त्यात सततच्या पेट्रोल-डीझेल दर वाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली.

मागील काही दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून पेट्रोलचा दर १०२.४५ रुपये प्रति लिटर पर्यंत गेला आहे. तर डीझेल देखील ९० च्या पार गेले आहे. जळगावमध्ये  डिझेल ९३.०२ रुपये प्रति लिटर गेले आहे.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज