पेट्रोल डिझेलबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तरी मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी इंधन दर जैसे थे ठेवले आहेत. सध्या आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.६७ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.१० रुपये इतका आहे

इतर मोठ्या शहरातील दर 

मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.३९ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.३४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.०८ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.७२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.७७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.८४ रुपये झाले आहे.

आज डिझेलचा भाव देखील जैसे थेच आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.३३ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.७७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.३८ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.८४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.५७ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.१९ रुपये आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -