⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ ; वाचा आजचे जळगावातील प्रति लिटरचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा इंधन दरात वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज गुरुवारी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली. या दरवाढीनंतर जळगावमध्ये पेट्रोलचा भाव १०९.०३ रुपये प्रति लिटर इतके आहे. तर डिझेल ९७.३१ रुपये प्रति लिटरवर आले आहे. यापूर्वी मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली होती तर बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते.

मागील गेल्या काही महिन्यात पेट्रोल दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशभरात इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल शंभरीपार गेले आहे. तर डिझेल शंभर रुपयाच्या उंबरवठ्यावर आले आहे. युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८०.६९ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे. केली आहे.

इतर मोठ्या शहरातील पेट्रोल दर

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.७१ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.६४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.३६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.१७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.११ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.१८ रुपये झाले आहे.

इतर मोठ्या शहरातील डिझेल दर 
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.५२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९४.९५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.९७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.७७ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.३८ रुपये आहे.