आजचा पेट्रोल डीझेलचा दर ; ‘हे’ आहेत जळगावातील नवे दर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । सततच्या दर वाढीने पेट्रोलने देशभरातील अनेक शहरात शंभरी पार केली आहे. तर डीझेल दरानेही शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे. जळगावमध्ये पेट्रोल दर १०६ रुपयाच्या वर गेले आहे. तर डीझेल दर ९६ रुपयांच्या वर गेले असून शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सततच्या भाव वाढीने जळगावमध्ये पेट्रोल इतिहासात पहिल्यांदा १०० च्या वर गेले आहे. आज जळगावमध्ये पेट्रोल दर १०६.०१ प्रति लिटर आहे. तर डीझेल ९६.३० रुपये आहे.  

जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०६.०१ रुपये पर्यंत आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९६.३० प्रति लिटर झाले आहे. म्हणजेच गेल्या ३० दिवसात पेट्रोल आणि डीझेल भावात जवळपास ५ रुपयाची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar