fbpx

नऊ दिवसांमध्ये पेट्रोल 1.05, तर डिझेल 2.09 रुपयांनी महागले ; वाचा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । देशात आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरूच आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डीझेलच्या भावात दरवाढ करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून रविवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. त्यानुसार पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर चा दर १०९.३९ रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९७.८२ रुपये इतका आहे.

गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे.

पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.39 आणि 90.77 रुपये इतका आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज