इंधन दरवाढ सुरूच ; जळगावात पेट्रोल ११५ रुपयांवर

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । सततच्या इंधन दरवाढीमुळे नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात प्रचंड वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले. त्यामुळे जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११५ रुपयांवर गेला आहे. तर १०५ रुपयांवर येऊन ठेपले आहे.

आधीच देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली गेली असतात त्यात सततच्या इंधन दरवाढीचा बोजा सहन करावा लागत आहे.  दरम्यान, महिनाभरात पेट्रोल ७.८५ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेल जवळपास ८.७५ रुपयांनी महागले असून पेट्रोल- डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होत आहे.

दररोज ६ वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज