⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल; आज पेट्रोल-डिझेल महागले

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल वाढ केली. तब्बल २२ दिवसानंतर कंपन्यांनी पेट्रोलचा भाव वाढवला तर डिझेलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ केली. आज मंगळवारी देशभारत पेट्रोल २० पैशांनी महागले आहे. त्यापाठोपाठ आज डिझेलमध्ये २५ पैसे वाढ झाली आहे.आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १०८.७२ रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९६.६३ रुपये इतका आहे.

सलग तिसऱ्या दिवशी डिझेल महागले असून यामुळे मालवाहतूकदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी सोमवारी कंपन्यांनी डिझेल दरात २५ पैशांची वाढ केली होती. रविवारी देखील डिझेल २५ पैसे वाढ करण्यात आली होती.

पेट्रोलियम कंपन्यांनी ०१ आणि ०५ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात अनुक्रमे १५ पैशांची कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु आज तब्बल २२ दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल महागले आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.४७ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.१५ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८३ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९० रुपये झाले आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.२१ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.५७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.१७ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६७ रुपये प्रती लीटर इतका वाढला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.०५ रुपये झाले आहे.