fbpx

तूर्त दिलासा ; जळगावातील पेट्रोल-डिझेलचा आजचा ‘हा’ आहे भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । देशभरात पेट्रोल आणि डीझेलच्या दर वाढीने महागाईचा भडका उडाला आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. तेल कंपन्यांनी आज सलग अकराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे.

आज सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहे. जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८  रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. 

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती ९ वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये ५ वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये १६-१६ वेळा वाढ झाली होती. ४ मेनंतर सलग झालेल्या पेट्रोल-डिझेल यांच्या किमतीतील वाढीमुळे १६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत.

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६  प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपये ५२ पैसे प्रति लिटर वाढले आहेत.  

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ ७७ डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात १० टक्क्यांहून कमी होत ६८.८५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी ७० डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज