सलग दुसऱ्या दिवशी डीझेल महागले ; वाचा आजचा प्रति लिटर पेट्रोल-डीझेलचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहे. त्यात कंपन्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. तर  पेट्रोलच्या दरामध्ये गेल्या २२ दिवसांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सोमवारी जारी केलेल्या दरानुसार डिझेल २५ पैशांनी महागले आहे. आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर 108.52 रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९६.३८ रुपये इतका आहे.

पेट्रोलचा दर २२ दिवसांपासून स्थिर

पेट्रोलियम कंपन्यांनी ०१ आणि ०५ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात अनुक्रमे १५ पैशांची कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे.

डिझेलचा २५ पैशांनी महागले

गेल्या ४ दिवसांमध्ये ३ वेळा दर वाढवण्यात आल्यामुळे डिझेल ७० पैशांनी महाग झाले आहेत. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.९४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.३२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.९३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.४२ रुपये प्रती लीटर इतका आहे.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज