⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? ; तपासा जळगावातील नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । गेल्या मागील काही दिवसापासून इंधन दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहे. त्यामुळे जळगावमध्ये देखील दर मागील ९ दिवसापासून स्थिर आहे.

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ ७७ डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात १०  टक्क्यांहून कमी होत ६८.८५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी ७० डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते. 

दरम्यान, आज सोमवारी जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. 

मागील गेल्या २६ दिवसात जळगाव शहरात पेट्रोल दर २.२७ पैसे तर डिझेल ७२ पैशांनी महागले आहे. याच पध्दतीने दरात किरकोळ वाढ होत गेली तर पुढील काही दिवसात पेट्रोल ११० रूपये प्रति लिटर मिळेल यात शंका नाही.  जळगाव शहरात गेल्या वर्षी १४ जून २०२० रोजी पेट्रोलचे दर ८३.७१ रूपये तर डिझेल ७२.५४  प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून तेरा महिन्यात पेट्रोलचे दर २५ रूपये २७ पैशांनी तर डिझेलचे २४ रूपये ५४ पैसे प्रति लिटर वाढले आहेत. जुलै २०२१ या महिन्यात  दरात तब्बल ९ वेळा वाढ करत कंपन्यांनी वाहनधारकांना मोठा झटका दिला. त्यामुळे जनतेत रोष आहे.