fbpx

इंधन भडका सुरुच ; जाणून घ्या जळगावातील आजचे नवीन दर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे जनसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यात भर म्हणून लाॅकडाउनदरम्यान पेट्रोल डीझेलचा दर वाढीचा आलेख वाढता राहिला आहे. दरम्यान, आज जळगावमध्ये पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ झाली आहे.  जळगावात पेट्रोलच्या दरात आज २२ पैशाची वाढ झाली आहे. तर डीझेलच्या भावात २६ पैशाची वाढ झाली आहे.

देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आजच्या भाव वाढीनंतर जळगावात पेट्रोल १०० रुपये ९२ पैसे, तर डिझेल ९१ रुपये ३३ पैसे प्रतिलिटर झाले आहे.  दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिश्याला मोठी कात्री लागणार आहे.

मागील दीड वर्षांपासून देशासह राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने गतवर्षी लाॅकडाउन लागू केले होते. तर राज्य शासनाने गतवर्षीसह यंदाही ता.१५ एप्रिलपासून राज्यात लाॅकडाउन लागू केले आहे. या लाॅकडाउनमध्ये असंख्य नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांचे रोजगार ही गेले आहेत. या महामारीत महागाईचा आलेख खाली आणूण शासन सामान्य नागरिकांना दिलास देईल अशी अपेक्षा होती.

मात्र, मागील दीड वर्षांपासून आर्थिक संटकात असलेल्या जनसामान्यांसाठी महागाईचा आलेख नियंत्रणात ठेवण्यास केंद्रासह राज्य शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे खाद्यतेल, घरगुती गॅस, डाळी, पेट्रोल दरवाढ ही लाॅकडाउनदरम्यान झाली आहे. या लाॅकडाउनमध्ये कमाईचे साधन गमावल्यानंतर महागाईचे चटे सामान्य नागरिकांना बसत आहेत. त्यात मंगळवारी (ता.२५) जळगाव शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १००.९२ रूपये झाले. तर डिझेलचे दर प्रतिलिटर ९१.३३ रूपये झाले. त्यामुळे लाॅकडाउनमध्ये आर्थिक संकाटात आलेल्या सामान्य नागरिकांच्या डोक्यावर पेट्रोल व डिझेल दरवाढीचे ओझे लादले गेले आहे.

इतर मोठ्या शहरातील इंधन दर

आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.७० रुपयांवर गेला आहे. मुंबईत पेट्रोल शंभरी गाठण्यापासून आता केवळ एक पाऊल दूर आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.४४ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.०६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.४९ रुपये झाला आहे.

मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९१.५७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.३२ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.११ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.१६ रुपये प्रती लीटर झाले आहे.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज