⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

70 दिवसांनी डिझेलच्या दरांत वाढ ; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । देशभरात मागील काही दिवसापासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. परंतु आज पेट्रोलियम कंपन्यांकडून तब्बल 70 दिवसांनी डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. आज शुक्रवारी डिझेल डिझेलच्या किमतीत २० ते २२ पैशांची वाढ करण्यात आली आहे. अशातच पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.

दोन महिन्यांहून अधिक काळानं देशात डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. परंतु आज पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. मुंबईत डिझेलची किंमत दरवाढीनंतर 96.19 रुपये प्रति लिटरवरुन 96.41 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत डिझेल 88.62 रुपये प्रति लिटरवरुन 88.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 15 जुलै 2021 रोजी डिझेलच्या दरांत वाढ झाली होती. तेव्हा पेट्रोल 15 पैशांनी महागलं होतं. परंतु, त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ झालेली नव्हती. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंधनाच्या दरांत काही प्रमाणात घट झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. देशाच्या राजधानीच्या शहरात पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 101.62 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 91.92 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती 98.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 93.46 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील चार महानगरांची तुलना केली, तर पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत.