इंधन दरवाढ थांबेना : जळगावात पेट्रोल ११४ रुपयांवर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. त्यामुळे जळगावात पेट्रोलचा दर ११४ रुपयावर गेले आहे. तर डीझेलचा दर १०३ रुपयावर गेले आहे.

देशभरात आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. गॅस दरवाढीने किचन बजेट कोलमडून गेले आहे. त्यात सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जळगावात गेल्या दहा दिवसात पेट्रोलच्या दरात ३ रुपयापर्यंतची वाढ झाली तर डीझेलच्या दरात देखील ३ रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११३.४६ रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर १०४.३८ रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०७.५६ आणि ९६.३२ रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज