fbpx

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव ; २४ जुलै २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी सलग सातव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे जळगावमध्ये देखील दर मागील सात दिवसापासून स्थिर आहे.

 देशभरात पेट्रोल आणि डिझेल विक्रमी पातळीवर आहेत. गेल्या आठवड्यात कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली होती. तब्बल तीन महिन्यानंतर डिझेलमध्ये किंचिंत दर कपात झाली होती. तर पेट्रोलचा भाव आता ११० रुपयांच्या दिशेने वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. 

सात दिवसांपूर्वी पेट्रोल ३० पैशांनी महागले होते. तर डिझेलमध्ये १५ पैशांची कपात झाली होती. आज शनिवारी जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. 

गेल्या २४ दिवसात जळगाव शहरात पेट्रोल दर २.२७ पैसे तर डिझेल ७२ पैशांनी महागले आहे. याच पध्दतीने दरात किरकोळ वाढ होत गेली तर पुढील काही दिवसात पेट्रोल ११० रूपये प्रति लिटर मिळेल यात शंका नाही.  जळगाव शहरात गेल्या वर्षी १४ जून २०२० रोजी पेट्रोलचे दर ८३.७१ रूपये तर डिझेल ७२.५४  प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून तेरा महिन्यात पेट्रोलचे दर २५ रूपये २७ पैशांनी तर डिझेलचे २४ रूपये ५४ पैसे प्रति लिटर वाढले आहेत. जुलै २०२१ या महिन्यात  दरात तब्बल ९ वेळा वाढ करत कंपन्यांनी वाहनधारकांना मोठा झटका दिला. त्यामुळे जनतेत रोष आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज