⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

आजचा पेट्रोल डिझेलचे दर जाहीर ; वाचा प्रति लिटरचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । सलग तीन दिवस डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर सामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी या दरकपातील ब्रेक लावला.

आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन दिवसांमध्ये डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले होते. मात्र, पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. 18 जुलैपासून देशभरात पेट्रोलचा दर स्थिर आहे.

दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.३३ रुपये इतका झाला आहे. जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १६ रूपयेपर्यंत तर डिझेलचे १४ रूपये प्रति लिटर वाढले आहेत.

आज मुंबईत प्रतीलिटर डिझेलसाठी ९६.८४ रुपये मोजावे लागत आहेत. तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०७.८३ रुपये इतका आहे. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी १०१.८४ तर एका लीटर डिझेलसाठी ८९.२७ रुपये मोजावे लागत आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.