fbpx

आजचा पेट्रोल डीझेल दर जाहीर : २ सप्टेंबर २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । काल काहीसा दिलासा दिल्यानंतर आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डीझेल दरात कोणताही बदल केला नाहीय. आज गुरुवारी पेट्रोल डीझेल दर जैसे थे आहे. त्यापूर्वी काल देखील देशभरात पेट्रोल-डीझेल दर स्थिर होते. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.६७ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.१० रुपये इतका आहे.

मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक काढला होता. मात्र, जुलै महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यानंतर संपूर्ण जुलै महिना पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात इंधनाचे दर किंचित का होईना कमी झाले होते.

चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली होती. गेल्या मंगळवारी इंधनाच्या दरात शेवटची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर आठवडाभर इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा जुलै महिन्यासारखीच परिस्थिती निर्माण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt