⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत आज कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । मागील अनेक दिवसापासून पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. सलग चार दिवस कंपन्यांनी इंधन दरवाढ केली. त्याचे परिणाम आता बाजारात दिसू लागले आहेत. दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दर जैसे ठेवले आहे. मात्र मागील चार दिवस झालेल्या दरवाढीने जळगावात पेट्रोल ११३ रुपयांवर तर डिझेल १०२ रुपयांवर गेले आहे.

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ४.६५ रुपयांनी महागले आहे तर मागील १९ दिवसांत डिझेल ६ रुपयांनी महागले आहे. करोना संकट कमी झाल्याने सरकारकडून वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. बहुतांश राज्यांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असून बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. परिणामी देशात इंधन मागणीत देखील प्रचंड वाढ झाली आहे.

देशभरात आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. गॅस दरवाढीने किचन बजेट कोलमडून गेले आहे. त्यात सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.