दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना झटका : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती सतत वाढत आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्या प्रतिलीटर दरात 38 पैशांनी वाढ झाली आहे. जळगाव मध्ये आज प्रति लिटर डिझेलचा दर १०१ रुपये इतके आहे. तर पेट्रोल प्रति लिटर १११.९० रुपये प्रति लिटर इतके आहे.

जळगावमध्ये गेल्या १५ दिवसात पेट्रोल जवळपास ३ रुपयाने महागले आहे. १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल दर प्रति लिटर ९१ रुपयापर्यंत होते. ते आज १११ रुपयांवर गेले आहे. म्हणजेच गेल्या १० महिन्यात पेट्रोल दर २० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबरमध्ये डिझेल ४.५० रुपयांनी महागले आहे. २०२१ सुरवातीला डिझेल चा दर ८० रुपये होता. तो आता १०१ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात देखील गेल्या १० महिन्यात २१ रुपयाची वाढ झाली.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज