⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावात पेट्रोल पाठोपाठ डिझेल दराने ठोकले शतक

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडालेला दिसून येत आहे. मागील गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली पेट्रोल आणि डिझेलमधील दर वाढ अद्यापही कायम आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल च्या भावात वाढ झाली आहे. आधीच पेट्रोलने दराने शंभरी पार केली असता आता त्यात डिझेलच्या दरानेही शंभरी गाठली आहे. जळगाव मध्ये आज प्रति लिटर डिझेलचा दर १००.६२ रुपये इतके आहे. तर पेट्रोल प्रति लिटर १११.५९ रुपये प्रति लिटर इतके आहे.

आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. त्यामुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे.  जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

जळगावमध्ये गेल्या १० दिवसात पेट्रोल जवळपास २.५० रुपयाने महागले आहे. १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल दर प्रति लिटर ९१ रुपयापर्यंत होते. ते आज १११ रुपयांवर गेले आहे. म्हणजेच गेल्या १० महिन्यात पेट्रोल दर २० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबरमध्ये डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे. २०२१ सुरवातीला डिझेल चा दर ८० रुपये होता. तो आता ९९ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात देखील गेल्या १० महिन्यात २० रुपयाची वाढ झाली.

आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती सतत वाढत आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. बजेट कोलमडून महिन्याच्या खर्चात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्याच पेट्रोल आणि डिझेलचा भाव शंभरी पार गेला आहे.