fbpx

पेट्रोल डीझेलच्या दरात पुन्हा वाढ ; जळगावात पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । गेले दोन दिवस इंधनाच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आज सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 18 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 26 ते 35 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे.

आजच्या दरवाढीनंतर जळगावात पेट्रोल ९८.९५ रुपये प्रतिलिटर वर गेल आहे. तर डीझेल ८८.८६ प्रतिलिटर आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९७.८६ रुपये झाला आहे. तर धुळ्यात पेट्रोल ९८.१८ रुपये झाले आहे. नंदुरबारमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव ९८..७२ रुपये आहे. तर नाशिकमध्ये पेट्रोलचा भाव ९७..७२ रुपये झाला आहे. आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८९.१७ रुपये झाला आहे. धुळ्यात डिझेलचा भाव ८८.१३ रुपये झाला आहे. नंदुरबार डिझेल ८८..६५ रुपये प्रती लीटर आहे. नाशिकमध्ये डिझेल ८७.६७ रुपये प्रती लीटर झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.92 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.73 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.79 रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज