⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । नवीन वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यानी सलग ५७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवल्याचा निणर्य घेतला आहे. आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जळगावात एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेल ९४.०२ रुपये इतका आहे.

सरते वर्ष वाहनधारकांसाठी खिसा खाली करणारे ठरले. २०२१ मध्ये पेट्रोलने पहिल्यांदाच १०० ओलांडली तर डिझेलने देखील विक्रमी पल्ला गाठला. याची मोठी झळ मध्यमवर्गाला बसली. इंधन दरवाढीने महागाईचा देखील भडका उडाला होता. किमान नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होईल या आशेवर बसललेया भारतीयांच्या नशिबी आणखी काहीकाळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवले.

देशातील मोठ्या शहरातील दर
मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा दर १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. मुंबईत आज एक लीटर डिझेलचा दर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून, कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये महागाई कमी करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले होते. इंधनावरील शुल्कातून केंद्र सरकारला मोठे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. २०१६ ते २०२१ च्या पाच वर्षांच्या कालावधीत इंधनावर ११.७४ लाख कोटी रुपयांचे केंद्रीय उत्पादन शुल्क प्राप्त झाले. यात सेसचाही समावेश आहे.

हे देखील वाचा :