⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

आजचा पेट्रोल आणि डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । देशातील ५ राज्यांच्या निवडणूक संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सुरू केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डीझेल दरात वाढ केली आहे.  कच्च्या तेलातील दरवाढीने कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल दरात ३१ पैसे वाढ झाली आहे.

आज जळगावात प्रतिलीटर पेट्रोलचा दर ९८.५७ तर डिझेलचा दर प्रतिलीटर ८८.३३ इतका आहे. जळगावातील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. काल जळगावात पेट्रोलची किंमत ९८.३३ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत ८८.०२ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली होती.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

गेल्या तीन महिन्यात जळगावात पेट्रोल जवळजवळ ७ रुपयांनी महाग झालं आहे. तर डीझेल दरात ८ रुपयांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 97.34 , डिझेल 88.54

पुणे: पेट्रोल- 96.98, डिझेल 86.79

नाशिक: पेट्रोल- 97.74, डिझेल 87.53

औरंगाबाद: पेट्रोल- 98.58, डिझेल 89.73