fbpx

पेट्रोल-डिझेल महागले ; जाणून घ्या जळगावमधील आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । पश्चिम बंगालसह चार राज्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १८ दिवस इंधन दर जैसे थेच ठेवले होते. मात्र निवडणूक संपताच कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सुरू केला आहे. आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 19 आणि 21 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. दरम्यान, मंगळवारी पेट्रोल 15 तर डिझेल 18 पैशांनी महागले होते.

जळगावमधील पेट्रोलचा दर
गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आता वरच्या दिशेने प्रवास सुरु केल्याचे दिसत आहे. जळगावमध्ये आज पेट्रोल १८ पैशांनी महागले आहे. तब्बल १ महिन्यानंतर दरात वाढ झाल्याने पेट्रोल आज ९८.३३ रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी म्हणजेच ०६ जानेवारी २०२१ ला जळगावात पेट्रोल चा दर ९१.७९ रुपये होता. तेव्हा पासून आतापर्यंत तब्बल ६.५४ रुपयांनी महाग झालं आहे.

mi advt

डीझेल दर 
डीझेल च्या दरात देखील आज वाढ झाली आहे. आज डीझेल २२ पैशांनी महागले आहे. काल मंगळवारी २२ डीझेल दरात २२ पैशांनी घसरण आली होती. मात्र आज वाढ झाली आहे. तीन महिन्यापूर्वी डीझेल ८०.७२ रुपये होते. तेव्हा पासून आतापर्यंत डीझेल दरात ताब्ब्क ७.३० रुपयांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 97.12, डिझेल 88.19

पुणे: पेट्रोल- 96.76, डिझेल 86.50

नाशिक: पेट्रोल- 97.52, डिझेल 87.24

औरंगाबाद: पेट्रोल- 98.35, डिझेल 89.43

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज