⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

आजचा पेट्रोल डीझेलचा दर जाहीर : जाणून घ्या जळगावातील नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । मागील गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डीझेल दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. दरम्यान, आज जळगावमध्ये पेट्रोल डीझेल दर जैसे थे आहे. जळगावमध्ये पेट्रोल दर १०६ रुपयाच्या वर गेले आहे. तर डीझेल दर ९६ रुपयांच्या वर गेले असून शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज जळगावमध्ये पेट्रोल दर १०६.४१ प्रति लिटर आहे. तर डीझेल ९६.३६ रुपये आहे. 

जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०६.४१ रुपये पर्यंत आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९६.३६ प्रति लिटर झाले आहे.  

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.