fbpx

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा दणका ; जाणून घ्या जळगावातील पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । पेट्रोलिय कंपन्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा दणका दिला आहे. आज डिझेल स्थिर असले तर पेट्रोल दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. सततच्या दर वाढीने देशभरातील अनेक शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. तर डीझेल दरानेही शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे. जळगावमध्ये पेट्रोल दर १०६ रुपयाच्या वर गेले आहे. तर डीझेल दर ९६ रुपयांच्या वर गेले असून शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ केली आहे. तर डिझेल दर ‘जैसे थे’च ठेवले आहेत. यापूर्वी सलग दोन दिवस कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. 

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सततच्या भाव वाढीने जळगावमध्ये पेट्रोल इतिहासात पहिल्यांदा १०० च्या वर गेले आहे. आज जळगावमध्ये पेट्रोल दर १०६.४१ प्रति लिटर आहे. तर डीझेल ९६.३६ रुपये आहे.

५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ४ मे पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. ४ मेनंतर आजपर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण ३३ वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३२ वेळा वाढ झालीय. या भाववाढीमुळे देशातील अधिकाधिक पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे.

जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०६.४१ रुपये पर्यंत आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९६.३६ प्रति लिटर झाले आहे.  

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज