fbpx

खुशखबर : आज पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, वाचा ताजे दर

mi-advt

कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीच्या पार्श्वभूमीवर मागील सात दिवस देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवण्यात आले होते. आज मात्र बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात करून ग्राहकांना किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आज पेट्रोल आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले.  दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.६७ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.१० रुपये इतका आहे.

इतर मोठ्या देशातील किंमती?

मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.३९ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.३४ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.०८ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.७२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.७७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.८४ रुपये झाले आहे. त्यात १२ ते १५ पैशांची कपात करण्यात आली.

आज डिझेल देखील १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. या दर कपातीनंतर मुंबईत डिझेलचा भाव ९६.३३ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८८.७७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.३८ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.८४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.५७ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.१९ रुपये आहे.

IOCL दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीमध्ये बदल करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत फक्त एका एसएमएसद्वारे तपासू शकता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt