पादचाऱ्यांचा मोबाईल हिसकावणारा ‘मॉडेल’ गजाआड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरात रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावत जबरी चोरी करणारा अट्टल चोरटा ‘मॉडेल’च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. अक्षय उर्फ मॉडेल मुकेश अटवाल रा.गुरूनानक कॉलनी, जळगाव असे चोरट्याचे नाव असून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पादचाऱ्याचा मोबाईल फोनची जबरी चोरी केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मुकेश अटवाल उर्फ मॉडेल यास जळगाव शहरातील काट्याफैल चौकातून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याचे दोन साथीदार सहभागी असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

संशयिताला पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेतील आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जळगांव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी या पोलीस स्टेशनला मोबाईल फोन हिसकावून जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -