fbpx

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी जिल्हा दौऱ्यावर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे २३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात ते जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. पक्षीय संघटना बांधणीसाठी ते दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले जात आहे. 

जिल्हा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेश पातळीवर बैठका घेतल्या जात आहेत. नवीन जबाबदारी मिळाल्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले राज्याचा दौरा करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून ते बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यात येत आहेत. 

या दौऱ्यात ते भुसावळ, फैजपूर, अमळनेर आणि जळगावसह काही ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या दौऱ्यात जिल्ह्यात नवीन पदाधिकारी निवडले जाण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज