जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळही रेल्वे अपघाताची मोठी घटना टळली आहे. ती म्हणजे धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे अर्धे डब्बे सोडून पुढे गेल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडलीय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मात्र हा प्रकार कसा घडाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. रेल्वेच्या या झालेल्या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वेवाहतून दीड तास थांबवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे मागे घेऊन हे डब्बे जोडून रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. Patliputra Express Accident in Chalisagaon
काय आहे नेमकी घटना?
भुसावळमार्ग लोकमान्य टिळक टर्मिनलला जाणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस वाघळी स्टेशनपासून काही अंतर दूर गेल्यानंतर अचानक रेल्वेचे अर्धे डब्बे सोडून इंजिन पुढे गेली. पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे अर्धे डब्बे मागेच राहिले. तर इंजिनसोबत अर्धे डब्बे पुढे गेले होते. रेल्वे दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. त्यानंतर लोकोपायलटने रेल्वे एक्स्प्रेस थांबवली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे मागे घेऊन हे डब्बे जोडून रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेचे इंजिनला सर्वे डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.