भुसावळात उपचार घेत असलेल्या रुग्णाने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेबर २०२१ । आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने दुसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याचा प्रकार आज शुक्रवारी भुसावळ शहरातील रिदम हॉस्पीटलमध्ये घडला आहे. दरम्यान,यात त्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत असे की, तळवेल येथील रुग्णावर गेल्या दोन दिवसापासून भुसावळातील रिदम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. तो आयसीयूमध्ये दाखल असून आत्याने आज सकाळी हॉस्पीटलच्या खिडकीचे काच तोडून दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आहे.  उडी घेतल्याने या रूग्णाला दुखापत झाली.

दरम्यान, रूग्णालयातून उडी मारल्यानंतर हा रूग्ण थेट रस्त्यावर पळत सुटला. मात्र त्या रूग्णाच्या आप्तांनी पाठलाग करून त्याला पुन्हा समजावून रिदम हॉस्पीटलमध्ये भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या रूग्णाने नेमकी कशासाठी उडी घेतली. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संदर्भात रूग्णालयातर्फे अद्याप पर्यंत काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज