मुंबई मार्गावर पॅसेंजर गाड्या बंदच, चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची गैरसोय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीय. केवळ विशेष गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना अतिरिक्त भाडे देऊन याची झळ सोसावी लागत आहे. पॅसेंजर ऐजवजी मेमू एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भुसावळ रेल्वे प्रशासनाने घेतला असूनही याबाबत पाहिजे तसा सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत आहे.

कोरोनामुळे सर्व पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने या प्रवाशांना विशेष गाडी शिवाय दुसरा पर्याय नाही. नोकरीनिमित्ताने शहरात येणारे व जाणाऱ्यांची पसंती पॅसेंजर गाड्यांना असते. सर्वच स्थानकांत थांबत असल्याने या गाड्यांना मोठी गर्दी असते. एक्स्प्रेस व विशेष गाड्यांपेक्षा पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर कमी असल्याने तसेच या गाड्या प्रत्येक स्थानकांत थांबत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर गाड्या जीवन वाहिनी ठरते.

भुसावळ येथून नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक या मार्गावर पॅसेंजर धावते. ही पॅसेंजर लहान-मोठ्या सर्वच थांब्यांवर थांबत असल्याने चाकरमान्यांसह जिल्ह्यात येणाऱ्यासाठी पॅसेंजर ही जीवन वाहिनी ठरते. प्रवाशांच्या सुविधेसाठी मेमू एक्स्प्रेस सुरू होणार होती; मात्र अजूनही सकारात्मक निर्णय नसल्याने ग्रामीण प्रवाशांच्या गैरसोईत वाढ झाली आहे. त्यामुळे पॅसेंजर ऐजवजी मेमू गाडी लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

लहान-मोठ्या सर्वच स्थानकांत थांबते पॅसेंजर
भादली, शिरसोली, म्हसावद, माहेजी, परधाडे, गाळण, नगरदेवळा, कजगाव, वाघळी, दुसखेडा, सावदा, निंभोरा, वाघोडा जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या स्थानकांत या पॅसेंजर थांबतात.

या पॅसेंजर गाड्या बंदच : भुसावळ-देवळाली शटल, भुसावळ-वर्धा पॅसेंजर, भुसावळ-अमरावती पॅसेंजर, भुसावळ-कटनी पॅसेंजर, भुसावळ-इटारसी पॅसेंजर या पॅसेंजर गाड्या कोरोनाकाळापासून बंदच आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -