fbpx

सत्यशोधकांचा बडवानी मध्यप्रदेशच्या आंदोलनात सहभाग

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१।  मध्यप्रदेश मधील बडवाणी जिल्ह्यात नर्मदा बचाव आंदोलन , जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, संयुक्त किसान मोर्चा आयोजित शेतकरी आंदोलन आणि किसान जनसंसदला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून जळगाव, धुळे आणि इतर ठिकाणाहून सहभाग घेतला.

मध्य प्रदेश मधील बडवाणी जिल्यात सुरू असलेल्या आंदोलनास, प्रमुख उपस्थिती म्हणून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाचे शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव, आणि भगतसिंग यांच्या भाची गुरमित कौर, अन्य विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच नर्मदा बचाव आंदोलनाच्या साथी मेधा पाटकर यांनी विशेष परिश्रम आणि मेहनत घेऊन आयोजित केलेल्या आंदोलनास मध्य प्रदेशातील तसेच गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र येथील विविध संस्था, संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी, सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रतुन छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य युवती संघटिका स्वाती त्रिभुवन व सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सदस्य तुषार पुष्पदीप सूर्यवंशी आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष सिध्दांत बागुल यांनी प्रतिनिधित्व करत आंदोलना मध्ये शेतकरी विरोधी बिला विरुद्ध घोषणा व आझादी चा नारा देत सक्रिय सहभाग नोंदवला.

मध्य प्रदेशातील बडवानी शहरातील हुतात्मा चौकातून शहिदाना अभिवादन करत आंदोलनास सुरवात झाली. आंदोलनामध्ये आदिवासी तरूणांनी पारंपारिक नृत्य सादर करत आंदोलनाची शोभा वाढवली. तसेच आंदोलनामध्ये किसान विरोधी काले कानून वापस लो, किसान ऐकता मजदूर एकता जिंदाबाद ,आझादी च्या घोषणा सह मोर्चा संपूर्ण शहरातून फिरवत कृषि बाजार समिती( बडवाणी ) येथे मोर्चा चा समारोप झाला. आणि त्यानंतर किसान जनसंसद भरवण्यात आली होती. परंतु काहीच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने मांडवातील संपूर्ण लोक आहे तशीच बसून होती परंतु मंडप कोसळू लागल्याने सर्वांना जवळच असलेल्या पत्राच्या शेड मध्ये बसवून मंडम सावरत भर पावसात जनसंसद सुरू झाली. त्या संसदे मध्ये आदिवासी, शेतकरी, मच्छीपालक आणि इतर श्रमिक वर्गातील लोकांना तीन तीन मिनिटात आपले मनोगत व्यक्त करून आंदोलन यशस्वी रीत्या पार पडले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज