fbpx

क्लासचे नाव करून गेलेला शाळकरी मुलगा बेपत्ता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज २१ ऑगस्ट २०२१ । शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या सेंट्रल बँक कॉलनीत राहणारा १५ वर्षीय विद्यार्थी क्लासला जातो असे सांगून गेला असता घरी परतलाच नाही. परब रवींद्र स्वामी असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी, श्री. मंगलमुर्ती नगर, एकमुखी दत्त मंदिराच्या बाजुच्या गल्लीमध्ये रविंद्र रामदास स्वामी हे राहतात. शुक्रवार दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा मुलगा परब स्वामी हा क्लासला जातो असे सांगून घरातून गेला. क्लासचे नाव सांगून घरातून बाहेर पडलेला परब क्लासमध्ये पोहचलाच नाही तसेच बराच वेळ होऊन देखील घरी परतला नाही.

परबचे कुटुंबीय त्याचा कालपासून शोध घेत असून कुणालाही तो दिसून आल्यास मोबाईल क्रमांक 7588010995, 8983140472 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज