३ हजाराची लाच घेताना पंचायत समितीचा लिपिक जाळ्यात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । शेडच्या बांधणीसाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच घेताना जामनेर पंचायत समितीच्या लिपिकास आज सकाळी अँन्टी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केली. यामुळे समितीमध्ये मोठी खळबळ उडाली. वसंत पंडीत बारी (वय-५३, कनिष्ठ लिपीक जामनेर पंचायत समिती) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांना गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले आहे. सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे लिपिक वसंत बारी यांनी ३,०००/-रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज गुरुवारी सकाळी सापळा लिपिक वसंत बारी यास पंचायत समिती कार्यालय,जामनेर येथे आलोसे स्वतः बसत असलेल्या कक्षात तीन हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली.

यांनी केली कारवाई

पोलीस उपअधिक्षक शशिकांत  पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -