fbpx

मुक्ताईनगर येथील पंचायत समिती सभापतीचा राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर येथील पं.स.सभापती सुवर्णा प्रदिप साळुंके यांनी सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.

राजीनामा ठरल्याप्रमाणे देण्यात आला असुन, नवनियुक्त सभापती पदासाठी उपसभापती सुनिता किशोर चौधरी किंवा निमखेडी बु गणातुन सुकळी येथील पं.स.सदस्य विकास पाटील या दोघांपैकी एकाची वर्मी सभापती पदासाठी लागण्याची शक्यता आहे.

पं.स.चे विद्यमान सदस्य व सभापती यांचा कार्यकाल येत्या फेब्रुवारी मध्ये संपणार आहे.त्या अनुषंगाने पं.स.ची पंचवार्षिक निवडणूक येत्या जानेवारी २०२२ मध्ये अपेक्षित आहे.सभापती पदाबाबत ठरलेल्या कार्यकालाप्रमाणे विद्यमान सभापती सुवर्णा साळुंखे यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.

विद्यमान उपसभापती सुनिता चौधरी यांच्याकडे प्रभारी सभापती पदासाठी जबाबदारी तुर्त सोपविली जाणार असल्याचे समजते.
पं.स.चे एकुण आठ सदस्य होते.मुक्ताईनगर नगरपंचायत झाल्याने हा पं.स.गण बाद झाल्याने आता सात सदस्य आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज