राष्ट्रवादीने केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पंचामृतने अभिषेक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने रविवारी शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पंचामृतने अभिषेक करत कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुध, दही, लोणी, तूप, मधाने अभिषेक करण्यात आला. यावेळी माजी मंत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, जिल्हासरचिटणीस अशोक पाटील, सहकार आघाडी जिल्हा अघ्यक्ष वाल्मिक पाटील, महिला आघाडी महानगर अध्यक्षा मंगला पाटील, दिलीप माहेश्वरी, विनोद देशमुख, मजहरभाई पठाण, सुनिल माळी, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, राजू मोरे, रमेश बारे, अशोक सोनवणे, जितेंद्र चांगरे, राहुल टोके, सचिन पाटील इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.

आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व मुख्यमंत्र्यांनी बेताल व्यक्त करु नये आणि समाज कंटकाला पाठीशी घालू नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पहा व्हिडीओ प्रक्षेपण :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -