अन् पालकमंत्री ना.पाटील पोहचले थेट शेताच्या बांधावर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१  गावकीच्या शेत रस्त्यावरून वाद झाला असता तो सोडविण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन हा वाद सोडवत शेतकर्‍यांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

 

पाळधी बु.येथील शेतरस्ता खेडी कडोली ते टाकरखेडा येथे शेतकरी विजय पाटील. सतिश पाटील. अशोक पाटील .प्रकाश पाटील. श्री कृष्ण पाटील .गुलाब पाटील. शामराव पाटील .बाळासाहेब पाटील भुषण पाटील याच्या शेतरस्ता वादाची समस्या निर्माण झाली होती. हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कळताच  वादाचे निवारण करण्यासाठी स्वतः शेतीच्या बांधावर पोहचले व शेत रस्ताचा वाद आटोप्यात आणला.

 

या वेळी उपस्थित गावातील प्रगतशील शेतकरी देविदास आण्णा पाटील., अशोक आबा पाटील, सतीश पाटील, विजू बापू पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील, भगवान ठाकरे, बळीराम सपकाळे उपस्थित होते. परिसरात आज एकच चर्चा आहे पालकमंत्री वाद मिटवण्यासाठी स्वतः शेत बांधावर पोहचले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज