fbpx

पहूर पोलीस स्टेशनजवळ चोरट्यांचा डल्ला, साडेबारा लाखांचा ऐवज लंपास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । पहूर येथील पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर शेंदुर्णी रस्त्यावरील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडेबारा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, भुसार मालाचे व्यापारी अनिल रिखबचंद कोटेचा हे कुटुंबासह २५ ऑगस्टला राजस्थानला गेले होते. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी १२ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यात ९ लाख ७६ हजाराचे सोने व चांदीचे दागिने २ लाख ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ऐवज लंपास केला.

२९ ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास कामावरील हमाल इकबाल इस्माईल शेख हा घरातील पंप बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मागील दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप त्यांना तोडलेले आढळले. त्यांनी याची माहिती अनिल कोटेचा यांना कळवली. यानंतर ३० ऑगस्टला अनिल कोटेचा यांनी घरी येऊन पाहणी केली. कपाटातील सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्यांना आढळले.

सीसीटीव्हीची तोडफोड
सोमवारी सायंकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याचे पोलिसांना दिसले. उपनिरीक्षक पी.एस. बनसोड तपास करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज