fbpx

रक्षाबंधणासाठी पाचोरा बाजारपेठ सजल्या ; सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । आज रक्षाबंधन च्या दिवशी पाचोरा शहरातील बाजारपेठ या सणासाठी साजल्या आहे. विविध राख्या,नारळ,करढोडा अशा अनेक सण उपयोगी गोष्टींनी पाचोरा बाजारपेठ बहरली आहे.तसेच कोरोन परिस्थिती परिस्थिती पाहता नागरिक दुकानदार मास्क सैनिटांयाझर सुरक्षित अंतर व प्रत्येक दुकानात किमान 10 फुटाचे अंतर आहे.नागरिक सुरक्षा ठेऊन आनंदाने सण साजरा करत आहे.

 रक्षाबंधना बद्दल थोडे काही

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.

स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज