fbpx

पाचोऱ्यात शासकीय कार्यालये वगळता कडकडीत बंद

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यात व शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज  शुक्रवारी पहाटे ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त लावण्यात आली असुन नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याविषयी ताकीत दिली जात आहे. 

विनाकारण बाहेर पडल्यास पोलिस व पालिकेचे कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. शहरात मेडिकल स्टोअर्स, दवाखाने व दुध संकलन आणि वितरण केंद्र, बॅंका, शासकीय, निम शासकीय कार्यालये वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्याचा ७ . २ टक्के रुग्ण पाॅझीटीव्ह असल्याचा रेट आहे. तहसिल कार्यालयामार्फत १ नायब तहसिलदार, ५ मंडळ अधिकारी, १० तलाठी, ५ नगरपरिषदेचे कर्मचारी अशी ५ पथके तयार करण्यात आली असून ही पथके शहरात नेमुन दिलेल्या भागात कोविड नियमांचे पालन होत आहे की नाही? याबाबत सर्वेक्षण करीत आहे. 

यामध्ये सांगायो नायब तहसिलदार भागवत पाटील, मंडळ अधिकारी वरद वाडेकर, प्रशांत पगार, संजय साळुंखे, प्रकाश डहाके, डी. बी. पवार, तलाठी संदिप चव्हाण, एस. आर. बागुल, कैलास बहिर, सुनिल राजपुत, तात्याराव सपकाळ, जी. आर. लांजेवार, बी. एम. परदेशी, एन. एच. शेख, बी. एल. शहाने, आर. पी. शिरसाट, पालिका कर्मचारी चंद्रकांत चौधरी, पांडुरंग धनगर, शाम ढवळे, शामकांत अहिरे, शरद घोडके यांची तहसिलदार कैलास चावडे यांनी पथकात वर्णी लावली आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे गस्तीवर असुन जळगांव चौफुली, जारगांव चौफुली, कृष्णापुरी बस थांबा, एम. एम. काॅलेज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौक, गांधी चौक सह विविध भागात गस्त वाढविण्यात आली आहे. शहरात किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स, हाॅटेल, बिअर बार, पान टपरी, झेराॅक्स दुकाने, कटलरी दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, सराफ बाजार, कापड दुकाने, खाजगी कार्यालये कडकडीत बंद असल्याने संपूर्ण रस्ते निरमणुष्य झालेले दिसत आहे.  

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज