fbpx

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात पाचोरा भाजपकडून तहसीलदारांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । काही दिवसापूर्वी पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीनंतर भाजपा कार्यकर्त्यांवर अचानक हल्ले सुरु झाले आणि त्यात भाजपच्या 10 हुन अधिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला अजूनही हिंसाचार सुरूच आहे. त्यात 500 हुन अधिक भाजप कार्यकर्ते हिंसाचाराच्या भीतीने पश्चिम बंगाल सोडून आसाम ला गेले आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रतिक्रिया देताना बोलें आहे अशी परिस्थिती फाळणी दरम्यान झाली होती आणि आसाम चे नवनिर्वाचित. मुख्यमंत्री हिंमंत बिस्वा यांचे असे म्हणे आहे की, ही अशा परिस्तिथी साठी ‘टी एम सी ‘जवाबदार आहे. अजुनपण शेकडो भाजप कार्यकर्ता त्याच्या परिवारा सह हिंसाचाराला घाबरून असमला येत आहे.

आज 5 एप्रिल रोजी भाजप पक्षा तर्फे संपूर्ण देशभरात या पश्चिम बंगाल मधील हिंसाचारा विरोधात आज कोरोना नियम पाळून निदर्शन करत आहे. तसेच पाचोरा येथे तहसिलदार कैलास चावडे पाचोरा यांना निवेदन देण्यात आले. यात भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, याच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज