fbpx

बैल पोळा सणासाठी पाचोरा बाजार गजबजला

mi-advt

बैल पोळा सणा साठी आज पाचोरा बाजारात शेतकरी राजाने आपल्या शेतासाठी राबणाऱ्या बैल जोडी साठी वस्तू खरेदीसाठी लगबग केली. वर्षातून एक दिवस आपल्या सोबत असणाऱ्या सखा, सवंगगडी, आपला पुत्र मानतो. असा त्याच्या साजशृंगारासाठी आज शृंगार उपयोगी वस्तू शेतकरी राजा खरेदी करत आहे

ह्या मुहूर्त वर असतो पोळा

सन २०२१ मध्ये सोमवार, ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात हा सण साजरा केला जात आहे. याच दिवशी पिठारी अमावस्या आणि श्रावणातला शेवटचा पाचवा सोमवार आहे. यामुळे या दिवसाला अधिक महत्व प्राप्त होत आहे. श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे.

असा साजरा केला जातो पोळा

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.

बैलांचा साजशृंगार

पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. करोना संकटाचा विचार करता मिरवणुका काढता येणार नाहीत, तरी शेतकरी वर्ग घरच्या घरी हा सण साजरा करतील, यात शंका नाही. परंतु जर इतर सर्व सुविधा सुरू केल्या गेल्या आहे आणि भाविकांचे श्रद्धा स्थान मंदिरे बंद आहेत असे सांगणाऱ्या, यावर आक्रमक झालेल्या श्रद्धाळूंनी मनावर घेतलं तर हा सण आणि येणारे पुढील सर्वच सण परंपरेनुसार साजरे होतील अशी शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज