जिल्हाभरात ६ हजारांवर विद्यार्थांनी दिली राष्ट्रीय संपादणूक चाचणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिकस्तर तपासणीसाठी राज्यात शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत शुक्रवार दि.१३ रोजी जिल्ह्यातील २०५ शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. जिल्हाभरातील २६२ वर्गातील ६ हजार ३३२ विद्यार्थांनी ही परीक्षा दिली.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक स्तर तपासणीसाठी शुक्रवार दि.१२ रोजी देशभरात एकाच वेळी संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली. राज्यात शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. २०५ शाळांमधील २४८ वर्गात एकूण ६ हजार ३३२ विद्यार्थांनी या सर्व्हेक्षण चाचणीत सहभाग घेतला. परीक्षेसाठी सीबीएसई शाळांतील शिक्षकांना परीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या नेतृत्वाखाली व डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा घेण्यात आल्या.

अशी हाेती परीक्षा
तिसरी आणि पाचवीसाठी भाषा, गणित व ईव्हीएस हे तीन विषय, आठवीसाठी भाषा, गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र हे चार विषय तर दहावीसाठी भाषा, गणित, सायन्स, सामाजिकशास्त्र, इंग्रजी या विषयांची एकत्र परीक्षा घेण्यात आली. पेपर सोडवण्यासाठी पाचवी व आठवीला ९० मिनिटे, आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांना १२० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थांसाठीच्या प्रश्नपत्रिका या सीलबंद पाकिटात शाळांमध्ये नेण्यात आल्या. परीक्षेनंतर उत्तर पत्रिका जमा करून त्या प्रशिक्षण परिषदेमार्फत केंद्राकडे पाठवण्यात आल्या. सर्व्हेच्या आधारे लवकरच गुणवत्ता जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज