रायसोनी महाविद्यालयात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमांतर्गत’ ऑनलाईन नृत्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडीशा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अनुषंगाने शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमांतर्गत’ऑनलाईन नृत्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी पोस्टर स्पर्धेत भक्ती ठोंबरे यांनी प्रथम तर गायत्री दुनाखे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. एकल नृत्य स्पर्धेत डिंपल सोनवणे यांनी यश संपादन केले तर युगल नृत्य स्पर्धेत सिमरजीत कौर आणि संपत्ती सचदेव (बीबीए द्वितीय वर्ष) यांनी यश मिळविले. वादविवाद स्पर्धेत प्रथम श्रुती बडगुजर आणि हर्ष मिश्रा तर द्वितीय संदेश तोतला आणि सचिन पांडा व तिसरा क्रमांक गणेश पाटील आणि चेतन शुक्ला यांनी मिळविला. स्पर्धासाठी डॉ. ज्योती जाखेटे व प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी तर संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज