सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील नेहरू युवा केंद्र व फैजपूर येथील त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियानाचा समारोप नुकताच करण्यात आला. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये गावातील अनेक विद्यार्थ्यांनी व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.

स्वच्छ भारत अभियानाचा समारोप व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी फैजपूर येथील त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाचे अध्यक्ष राहूल साळी, रोहन चौधरी, भावेश पाटील, शुभम पाटील, पुष्कर चौधरी आदी उपस्थित होते. त्रिवेणी गणेश मित्र मंडळाचे खजिनदार चेतन चौधरी हे पर्यवेक्षक म्हणून काम पहिले. कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्रचे यावल तालुका समन्वयक तेजस पाटील, पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी पहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्रिवेणी गणेश मित्र मंडळाचे गणेश चौधरी, चेतन चौधरी, भावेश चौधरी, भूषण चौधरी, अनिरुद्ध पाटील, मोहित कोलते, संकेत चौधरी यांसह त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली. स्पर्धेच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज