fbpx

ऑलनाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावतर्फे 22 व 23 मार्च 2021 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 115 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि ऑनलाईन आवेदन केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील.

उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. एम्प्लॉयमेंट पेजवरील जॉब सीकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी किंवा आधार क्रमांक व पासवर्डने लॉग ईन करावे आणि नियोजित दिवसाच्या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करावी. या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोंदणी करण्यास समस्या असल्यास कार्यालयीन वेळेत ( दूरध्वनी क्रमांक-0257-2239605) संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज